Friday, September 05, 2008


श्री महाराजांच्या जवळ , त्यांच्या चरणांशी बसलो की एक अद्भूत शांती जाणवते. मी कितीदा मनात प्रश्न घेऊन महारजांसमोर गेलो. पण त्यांना पाहताच प्रश्न आपोआप गळून पडतात. आनंदाच्या दिव्य लहरी रोमरोमातून धावू लागतात. काळाचे भान राहत नाही. काही बोलण्याची गरजच नसते. पण महाराजांची अमृतवाणी कानी पडावी म्हणून अधुन मधुन काही बोलतो. महाराजही ते बोबडे बोल मोठ्या कौतुकाने ऐकतात. त्यांचे प्रेम त्यांच्या नेत्रांमधून ओसंडून वाहत असते. पण त्यांच्या दॄष्टीला दॄष्टी भिडवण्य़ाचे साहस होत नाही.

त्यांच्या हातात एखादे फूल असते. मोठ्या प्रेमाने ते फूल महाराज हातात खेळवतात. त्या क्षणी त्या फुलाचा हेवा वाटतो.

सगळ्यांवर महाराजांचे सारखेच प्रेम आहे. सगळ्यांचीच ते आपुलकीने चौकशी करतात. मोबाईलवर त्यांना भक्तांचे सतत फोन येतात, आणि प्रत्येकाशी महाराज तितक्याच उत्साहाने बोलतात.

ते चालतात तेव्हा डोळ्यांचे पारणे फिटते. ते बघतात तेव्हा मन चिंब भिजून जाते. ते हसतात तेव्हा लाखॊ प्राजक्ताच्या कळ्या उमलल्या आहेत असे वाट्ते. ते बसले असतील तर त्यांचे चैतन्य वातावरणात लहरत राहते. ते पोहत असतील तर त्यांचे अचाट पोहणे पाहून अवाक होऊन जातो आपण! ते चालू लगले की वा्याशी स्पर्धा असते. ते कार चालवू लागले की दोनच मिनिटात १०० किमी चा वेग त्यांनी ओलांडलाच म्हणुन समजा.

ते जेव्हा चष्मा घालून लिहितात किंवा वाचतात तेव्हा तर त्यांना बघतच राहावे.

सद्गुरु श्रीराम महाराज मह्णाजे साक्षात परब्रह्मच आहे, नर्मदेच्या तटावर वसलेले !!
श्रीराम.

Friday, February 23, 2007

Shriram Maharaj Ramdasi


सदगुरु श्रीराम महाराजांचा संक्षिप्त जीवन परिचय

समर्थ सत्चिदानंद सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय!

पत्यक्ष परब्रम्ह जेव्हा नरदेह धारण करून पृथ्वीवर अवतरते, तेव्हा सर्वसामान्य बुद्धीवादी डोळयांना त्याची ओळख पटत नाही पण जो श्रद्धेने व अनन्य भावाने शरण जातो त्याला सद्गुरुरूपातील परमेश्वराची भेट याची देही, याची डोळा झाल्याखेरीज रहात नाही। जोवर सद्गुरुरूपी सूर्य आपल्या जीवनात प्रकाशत नाही तोवर आपण अंधारालाच आपले विश्व मानून जगत असतो।

आमचे भाग्य थोर की साक्षात सुर्यांचा सूर्य असे तेजस्वी, पण भक्तांसाठी चंद्राहुनही शीतळ , हनुमंताची वायुगती आणि प्रभुरामचंद्रांची अपार करूणा ह्यांचा संगम असलेले सद्गुरू श्रीराम महाराज आमचे सद्गुरू आहेत।

सद्गुरु श्रीराम महाराजांच्या रुपाने साक्षात विश्वाचे आदी-चैतन्यच नर्मदामातेच्या तीरावर वास करीत आहे। वात्सल्याचे वात्सल्य, प्रेमाचे प्रेम, करुणेचीही करुणा काय असेल, तीसुद्धा श्री महाराजांच्या गुणवर्णनास अपुरी आहे। नुकतेच बोबडे बोलू लागलेले बाळ जसे आईच्या उबदार वात्सल्याने सम्पुर्णत: व्यापलेले असते पण तिचे वर्णन मात्र करू शकत नाही, तशीच आम्हा भक्तांची अवस्था आहे।

श्रींचा जन्म कार्तिक वद्य॥ षष्ठीस ( दि। 15 नोव्हेंबर 1954 ) सातारा जिल्ह्यातील फलटण गावी झाला। परमेश्वर भाविकाच्या घरी जन्मतो असे म्हणतात । श्री एकनाथ महाराजही संतश्रेष्ठ भानुदासांच्या घराण्यातच जन्मले होते ना ? तद्वतच परमेश्वराने इनामदारांचे भाविक व श्रद्धाळू घराणे आपल्या अवतारासाठी निवडले। श्रींच्या आजोबांची मावशी सौ सरस्वती म्हणजे खुद्द श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रथम पत्नी होत। श्रींचे आजोबा श्री नारायणपंत, श्री गोंदवलेकर महाराजांचे अनन्य भक्त। स्वत: गोंदवलेकर महाराजांनी त्यांना आपल्या पादुका पुजेसाठी दिल्या होत्या।

श्रींचे वडिल श्री तुकारामपंत व मातोश्री उषादेवी, दोघेही श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित व अनन्य भक्त। संपुर्ण घरच भक्तीच्या रंगात आकंठ बुडालेले। अशा भाविक व रामरंगी रंगलेल्या घराण्यात श्रीरामांनी जन्म घेतला। तान्हेपणीच त्यांना फलटणहून घरी परत नेत असताना वाटेत फलटणच्या काळया रामाची रथयात्रा लागली। महाराजांनी श्रीरामाला पाहिले, श्रीरामाने महाराजांना पहिले। ह्यानंतर बाळाचे नाव श्रीराम ठेवण्यात आले। ती तिथी होती कार्तिक वद्य ॥ चतुर्दशी।

श्रींचा अन्नप्राशन संस्कारही श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणामृतानेच झाला।

श्री सहा वर्षांचे असताना परिवारासोबत गोंदवले येथे एकदा आले असता एक विलक्षण घटना घडली। मुर्तीसमोरील ताटातील प्रसादाचा पेढा त्यांनी बालसुलभ वृत्तीने खाण्यास उचलला। ते पाहून प्रसाद ठेवलेल्या भक्ताने या बालमुर्तीस एक टप्पल मारली। श्रींना खूप दु:ख झाले। त्याहुनही

अधिक दुखावली त्यांची गुरुमाउली। सद्गुरूंना प्रेमाचा पान्हा फुटला। श्री गोंदवलेकर महाराज प्रत्यक्ष समाधी मंदिरात प्रकटले व बाळ श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणत जा म्हणजे आणखी मोठा पेढा देईन असे म्हणत त्यांना जवळ घेतले। अशारितीने श्रींना पेढाही मिळाला व अनुग्रहही।

श्रींचे सातवीपर्यंतचे शिक्षण हिंगणे ह्या गावी झाले। आठव्या इयत्तेतील काही महिने गोंदवल्यात, त्यानंतरचे शिक्षण कोल्हापुरातील लेखिका व डाँक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्याकडे व पुढे मुंबईला पं श्रीपाद धुं कवीश्वर यांचेकडे राहून झाले। दिवसा घरातील कामे करावयाची व रात्री शाळेत शिकायचे अशा पद्धतीने श्रींनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले। अकरावीनंतर वैदिक शिक्षणासाठी कर्नाटकातील धारवाड व नंतर पुणे येथील वेद पाठशाळेत श्री राहिले। नित्य नैमित्तिक अनुष्ठान व जपसाधना सांभाळत त्यांनी वैदिक शिक्षण पुर्ण केले।

सद्गुरू श्री गोंदवलेकर महारजांनी आपल्या या लाड़क्या शिष्यास मग दासनवमीपासून 13 कोटी जपानुष्ठान कर! माझा तुला आशिर्वाद आहे अशी आज्ञा केली। ते वर्ष होते 1979।

नशिक जवळील समर्थांच्या साधनेने व सानिध्याने पुनित झालेले टाकळी हे क्षेत्र श्रींनी सधनेसाठी निवडले। या तपोभुमीतील एका शेतामधील 6X6 खोलीमध्ये ( पंप हाऊस ) अनुष्ठान सुरू केले। या काळात दुपारी नाशिक येथे जाऊन माधुकरी मागुन आणायची व रात्री व दिवसा जपात मग्न राहायचे असा श्रींचा दिनक्रम होता। ते रात्री दोन वाजता जपाला सुरुवात करीत! इथे साधनेत असताना सद्गुरूंच्या कृपेने ते एकदा चोरांच्या हल्ल्यातूनही बचावले।

याचवेळी गुरुआज्ञेने कृष्णा व नर्मदाकाठच्या अनेक तिर्थक्षेत्री श्रींनी भेट दिली व जपसाधना केली। प्रवासात परम पुज्य टेंबेस्वामी, स्वामी समर्थ, श्रीपाद वल्लभ, पलुसचे धोंडीबा, पुढे नर्मदाकाठी परम पुज्य चंद्रशेखरानंद सरस्वती इत्यादि विदेही सत्पुरुषांचे दर्शन त्यांना घडले। अनेक बद्धजिवांना श्रींनी मुक्ती दिली। साधनेच्या काळात सद्गुरूंनी त्यांना पावलोपावली मार्गदर्शन केले व अनेकदा दर्शनही दिले।

नर्मदेच्या तीरावर मोरटकक्यास परमहंस आश्रमात राहून श्रींनी आपली तेरा कोटी जपसाधना पुर्ण केली व 1987 साली त्यांच्या अनुष्ठानाची सांगता झाली। सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांना आशिर्वाद व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला।

गुरुआज्ञेनेच श्रींनी नर्मदामातेची परिक्रमा पारंपारिक पद्धतीने तीन वेळा पुर्ण केली। 1987 साली 133 दिवसांमध्ये, 1989 साली 85 दिवसांमध्ये व तिसरी परिक्रमा 1991 साली 108 दिवसांमध्ये पुर्ण केली। केवळ 85 दिवसांमध्ये नर्मदा परिक्रमा पुर्ण करणारे श्री एकमेव होत।

सद्गुरूंचे साधनाकालात वारंवार झालेले दर्शन, अनेक दिव्य अनुभव, श्रींनी ब्रम्हचैतन्यदासाचे आत्मकथन ह्या ग्रंथात शब्दबद्ध केले आहेत तेही गुरूआज्ञेनेच। हा दिव्य ग्रंथ म्हणजे सद्गुरुभक्तीची भगवद्गिताच होय।

1989 साली श्रींनी समर्थ कुटी ह्या दिव्य आश्र्माची स्थापना केली। हा आश्रम मध्यप्रदेशातील बडवाह नगराजवळील नावघाटखेडी येथे, नर्मदेच्या उत्तर तीरावर आहे। ह्याच ठिकाणी परम पुज्य श्री आनंदसागर महाराजांनी श्रीराममंत्राचे साडे तीन कोटी जपाचे अनुष्ठान पुर्ण केले होते। ह्या आश्रमात प्रभू श्रीराम,सीतामाता, लक्ष्मण व हनुमंत मुर्तींची स्थापना 1987 साली, श्री गोंदवलेकर महाराजांच्या मुर्तीची स्थापना 1999 साली, श्री ब्रम्हचैतन्येश्वर महादेवाची स्थापना 2000 साली, दक्षिणाभिमुख हनुमंताची स्थापना 2002 साली व नुकतीच नर्मदा मातेच्या मुर्तीची स्थापना श्रींच्या हस्ते 2007 साली झाली।

गुरूंच्या आज्ञेनेच श्रींनी गृहस्थाश्रमाचा स्विकार केला। ह्या प्रेमळ व उत्साहाने ओतप्रोत गुरुपत्नीचे नाव सौ जानकीदेवी असून भक्तमंडळी त्यांना आईसाहेब असे संबोधतात। आश्रमात होणारे रोजचे अन्नदान, अनुष्ठान, सर्व उत्सव, भक्तांचे वास्तव्य व सोयी, गोशाळा ह्या सर्व गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते। त्यांची साधनाही खूप मोठी आहे। आश्रमातल्या प्रत्येक कार्यात त्या सदैव तत्पर असतात।

आश्रामातील प्रत्येक दिवस हा उत्सवच असतो। अपार शांती, भावपूर्ण वातावरण व प्रत्यक्ष सद्गुरूंचा सहवास असा विलक्षण त्रिवेणी संगम इथे आढळून येतो।

श्रींचे अनुग्रहित शिष्य भारतभर व विदेशातही आहेत। जप करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जपातच आहेत हाच श्रींचा नित्य संदेश असतो व भक्तांच्या प्रेमाखातर ते नित्य भ्रमण करीत असतात। नाना प्रकारचे मान-अपमान, निंदा-स्तुती व शारिरिक कष्टदेखील श्रींच्या पदोपदी वाटयाला आले। पण ही गुरुमाउली इतकी सौम्य, इतकी प्रेमळ व शांत की सर्व प्रकार्ची भुषणे- दूषणे त्यांनी आनंदाने शिरावर धारण केली। शंकराने विष पचवूनही असुरांना आशिर्वादच दिले होते। ती शंकराची क्षमाशीलता म्हणजे श्री महाराजच। स्वत:च्या सद्गुरूंशी ते इतके समरस झाले आहेत की श्री ब्रम्हचैतन्यांपासून ते वेगळे उरलेच नाहीत। स्वत:च्या आचरणाने अनन्य सद्गुरुभक्तीचा असा काही आदर्श त्यांनी आम्हा भक्तांपुढे ठेवला आहे की आम्हाला फक्त डोळे मिटून त्यांच्या मागोमाग चालायचेच आहे। बाकी सांभाळून घेणारे ते स्वत:च तर आहेत।

जेथे जातो तेथे। तू माझा सांगाती। चालवीसी हाती धरोनीया।।

॥श्रीराम जय राम जयजय राम॥

Monday, January 29, 2007

थोरल्या महाराजांची जयंती

आज श्री गोंदवलेकर महाराजांची जयन्ती।
ह्या शुभ मुहुर्तावर एक असा संकल्प करूया, जो आपण आयुष्यभर पाळू।
मी सुरुवात करतो।
आज मी संकल्प करतो की वाणीने कुणालाही कधी दुखावणार नाही। मृदू वचन बोलेन।
मला माहीत आहे की हे मला जमणे कठीण आहे, पण माझे सद्गुरुच ते करवून घेतील अशी खात्री आहे।

श्री राम समर्थ ॥

Thursday, August 17, 2006

Monday, August 07, 2006

Majhe Maharaj


I can watch changes in me now.
1. whenever I am speaking out of my ego, I imediately become aware of it.
2. whenever I am angry , I can watch myself being angry.
3. I can watch my lust and passion for food. I feel bad about it. Feel ashamed of myself.
4. Now i am clear that sadguru is my only destination. To me God is Sadguru. when I go to any temple of any GOd, I automatically say " maajhe maharaj"
5. I feel wonderful peace in Jap. I can concentrate fast.
6. Most importatnt. I got my purpose of life and the path for it. Both are "Maharaj".

Ah! He is so divine. He is so blissful. He is so calm, peaceful, full of motherly love and caring nature.

Every word coming from is mouth is Honey !! He never hurts anybody. He speaks soft. he gives hints to us through his stories, jokes even from his normal speech. He speaks very few words and every word has a deep meaning.

His eyes are glittering with divine peace and Tej. He looks as if Lord Ram when he talks, walks, speaks or even when he is sitting quiet.

He has only one message " perform as much Jap as possible."

I can not express him in words. I just bow to him with rearfull eyes.

Thursday, May 04, 2006

The divine moment of Anugraha


15th January 2006.

We all went to sadguru's place after having bath. He was ready with flowers and other things required for padya pooja. He himself has knowledge of Rigveda and other Vedic rituals. He uttered Vedic mantras and called us one by one for the Anugraha.

He uttered the TARAK MANTRA in my ears, three times. I follwed him. I could simply feel some waves running in my body from bottom to top. It is not possible to actually describe that very moment. It was a "out of the body" experiecne for me. Then he gave us " smarani" a mala for performing JAP and told us to Utter the RAM mantra as many times a day as possible.

Deep within my heart, I could feel joy and peace.

Anugraha has turned my life in to a beutiful leaving expereince.

I do not feel lonely any more. Because I know my Sadguru, who is my divine mother , is always with me and is taking my care every moment.

Shriram Maharah is is full of peace, joy, enthusiasm, Bhakti and Love. He has no word "anger " inhis dictionary. He has no word fear " fear" in his dictionary.

Like my Param-sadguru ( Sadguru of my sadguru ) Shri Bramhachaitanya Gondavalekar Maharaj and the origine of our Guru Parampara Shr Ramdas Swami , he lives and NAMA and is completely dedicated to Lord Shri Ram.

After Anugraha , we had food at the Ashrama and then we had to rush to Indore to catch our train for Nagpur in the late noon.

Shri Ram samarth.

Prasanna

Thursday, March 23, 2006

The ceremony of Anugraha from Sadguru Shriram Maharaj

After we had a holy bath in the river shri Narmada, we came back to Ashram and to our surprice.. Shri Maharaj was waiting for us to come with a sweet smile of his face.

All of us did the Padya Poojaa and received the Anugraha one by one. It was a "out of the body " experience. When I was receiving manthra from Sadguru .. I could feel some waves in my body.The moment changed our lives.

We were given MALA for JAPA and Shri Maharaj insisted that we should do as much JAPA ( chanting of the mantra ) as possible.

We had our meals in the festive atmosphere in Ashram, where everybody was chnating " jai shriram" before and during meals. Food was was simple and house hold but tasted great. After all It was prepared with great love and peace.

Even the cooks in the Ashram have taken Anugraha and do regular Jap everyday.

Malhar was still having some fever. SO we ahd rest in our room for next few hours. But I tried to be as much nearby Shri Maharaj as possible.

I could feel the pure and divine love in his voice, heart and in his eyes. He was answering queries of all Bhaktas ( disciples ) what ever may be the query. He was keen on talking to everybody who called him on landline phone and cell phone.

I felt so relaxed , so peaceful and blissful in his divine company ! So lucky are we to have Anugraha and our wander for the purpose of life is at end now. we have got what we wanted. In fact we have got so much more than our expectations !

Shriram Maharaj, the disciple of Shri Bramhachaitanya Gondavalekar Maharaj is spreading the thoughts of his Guru all over the world. He is spreading the divine " Ram Nam " and giving purpose to the lives of those who come to his Ashram.

Prasanna Shembekar
09422807548